बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत असून दुपारी तीन वाजेपर्यंत ३४.९६ टक्के मतदान पार पडलं आहे. अशातच परवा दोन्ही उमेदवारांच्या प्रचारसभेच्या सांगता सभा झाल्या. तर आज रात्री बारामती मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी बारामती मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. त्यासंदर्भात त्यांनी शेळके यांच्या गाडीत पैसे असल्याचा व्हिडीओ देखील ट्विट केला होता. त्यावर आता सुनील शेळके यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंना कुठून सर्वात जास्त लीड मिळणार ? ” देवेंद्र फडणवीसांनी थेट आकडाच सांगितला
सुनील शेळके म्हणाले की, बारामतीचे युवराज समजणाऱ्यांनी स्थानिक गुंडांचा वापर करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भोर शहाराध्यक्षाला काल घरात घुसून मारहाण केली. तुमच्या गुंडांवरती गुन्हे दाखल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांच्या गाडीमध्ये नोटा टाकून त्याचे व्हिडीओ काढून बदनामी करण्याचा जो केविलवाणी प्रयत्न केला तो अतिशय निंदनीय आहे. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणण्यांनी जेजुरी देवस्थानच्या पायथ्याला हजार टन मटण व दारूच्या बाटल्या वाटून जो प्रचार केलाय. तो संपुर्ण बारामतीकरांना माहितीय. माझे आवाहन आहे की, अर्धवट व्हिडीओ पोस्ट करण्यापेक्षा संपुर्ण व्हिडीओ आपण सर्वांसमोर सादर करावा. तुम्हाला तुमचा पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने रडीचा डाव खेळू नका.
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंना कुठून सर्वात जास्त लीड मिळणार ? ” देवेंद्र फडणवीसांनी थेट आकडाच सांगितला
दरम्यान, एका बाजूला बारामतीत मतदान होत असतांना रोहित पवारांनी अनेक व्हिडीओ बाहेर आणले आहेत. काही ठिकाणी अजित पवार गटाकडून कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काही ठिकाणी पैसे वाटल्याचे व्हिडीओ शेअर केले जात आहेत. त्यावर आता रोहित पवारांच्या या आरोपाला आता अजित पवार गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
होय,आम्हाला अभिमान आहे आम्ही अजितदादांचे मावळे आहोत.! pic.twitter.com/PTcomGOcdU
— Sunil Shelke (@shelkesunilanna) May 7, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“आदित्य अन् उद्धव ठाकरेंना तुरूंगात पाठवण्यासाठी राऊत तयारी करताहेत”
हेही वाचा…“साहेबांनी आता आराम करावा, असं नेत्यांनी सांगायला हवं,” अजितदादांची प्रतिक्रिया
हेही वाचा…‘मुरलीअण्णा प्रभू श्रीरामांचे भक्त, २७ हिंदुत्ववादी संघटनाचा मोहोळांना पाठिंबा
हेही वाचा..पुण्याचा खासदार कोण होणार ? पुणेकरांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
हेही वाचा…“तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर..,’आढळरावांचं मतदारांना आवाहन