गंगाखेड : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याने गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. मौजे शिवाजीनगर तांडा ता. गंगाखेड येथील अनिल आडे हे, दीपावली निमित्त माहेरी आलेल्या आपल्या बहिणीला परत सासरी पालमकडे सोडण्याकरिता जात असताना त्यांची गाडी स्लीप होऊन त्याचा अपघात झाला. यात अनिल आडे आणि त्याच्या दोन भाच्यांना दुखापत झाली.
“25 पैशांवर नारायण राणेंचा फोटो.. हे फायनल करा..!” वादग्रस्त पोस्ट व्हायरल
या प्रसंगी त्यांना मदतीची गरज असताना रस्त्याने ये-जा करणारे नुसते पाहून पुढे निघून जात होते. यावेळी रत्नाकर गुट्टे हे आपल्या फार्म हाऊस वरून गंगाखेड कडे येत असताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आली.
“माझी नाहीतर देशातील 130 कोटी जनतेची मागणी”; केजरीवालांचं मोदींना पत्र
त्यांनी गाडी उभी करून अपघातग्रस्तांना स्वतःच्या गाडीतून उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघातग्रस्तांना मदत करीत आमदारांनी तात्काळ मदत उपलब्ध करून देत माणुसकीचे दर्शन घडविले यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Read also
- “राष्ट्रवादीने २३ वर्षात साडेसतरा वर्ष सत्तेत राहून जनसेवा केली”
- “मिंधे-फसनवीस सरकारने आता ‘जय जय गरवी गुजरात’ हा नारा बुलंद द्यावा”; सेेनेची जहरी टिका
- “सध्याच्या घडीला नारायण राणेंची किंमत चार आण्याची आहे”
- “..तर एक दिवस शिंदे सरकार मुंबईलाही गुजरातला देऊन टाकतील”
- “आपले मुख्यमंत्री दहीहंडी, मंडळ, फोडाफोडी या व्यतिरिक्त काहीच करत नाहीत”