सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पर्यटन मंत्री व शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात होते. मात्र अभिनेत्री रिया चक्रवर्तीने याबाबत मोठा खुलासा केला आहे. ती आदित्य ठाकरेंना भेटली नसल्याचे सांगण्यात आले आहे. रिया चर्कवरतीचे वकील सतीश माने शिंदे यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे
आदित्य ठाकरेंना मी कधीही भेटले नाही, असे रिया चक्रवर्तीने निवेदनात म्हटले तिचे वकील सतीश माने शिंदेंनी हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ‘आदित्य ठाकरे कोण आहेत हे रियाला माहीत नाही. ती त्यांना कधीही भेटलेली नाही. तिनं त्यांच्यासोबत फोनवरून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कधीही संवाद साधलेला नाहि असं स्पष्टीकरण रियाच्या वतीनं माने शिंदेंनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन विरोधी पक्षाकडून आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सोशल मीडियावरदेखील विरोधी पक्षाच्या समर्थकांकडून आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात होते. याप्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी स्वत: ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देऊन खुलासा केला आहे. याशिवाय शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीदेखील आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
‘रिया अभिनेता दिनो मोरिया यांना ओळखते. कारण ते चित्रपट क्षेत्रात आहेत. दोघं एकाच क्षेत्रात असल्यामुळे रिया दिनो मोरया यांना ओळखते’, असं रियाच्या वकीलांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया यांच्या नावाने सुरु असलेला युक्तीवाद अत्यंत निरर्थक असल्याचं वकील मानशिंदे म्हणाले आहेत.