मुंबई : भाजप नेते चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांच्यामध्ये कोणत्याना कोणत्या मुद्यावरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा यावरून चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल केला होता. हाच धागा पकडत ईडी आणि सीबीआयला घाबरून चित्रा वाघ भाजपमध्ये गेल्याचे चाकणकर यांनी नाव न घेता म्हटले आहे.
ED, CBI ची धमकी भारी, कुंकू वाचवायला कमळीच्या दारी……
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 4, 2021
‘ED, CBI ची धमकी भारी, कुंकू वाचवायला कमळीच्या दारी’, असा खोचक टोला नाव न घेता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.
दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा ट्विटरवॉर रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. चित्रा ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?, अशी टीका देखील काही दिवसांपूर्वी चाकणकरांनी चित्रा वाघ यांच्यावर केली होती.
Read Also :