पुणे : काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने जर स्वबळावर लढून त्यांना हिंदुस्थानमध्ये स्वतःची सत्ता आणायची असेल तर त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. जर नाना पटोले किंवा अन्य कुणी जर काँग्रेस स्वबळावर लढून लोकसभेत २८५ चे बहुमत आणून सत्ता आणणार असतील तर नक्कीच आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
पुण्यातील राजगुरूनगर खेड येथे संजय राऊत हे दौऱ्यावर आले होते. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
दरम्यान, नाना पटोलेंनी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. राज्यात काँग्रेस सध्या चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मात्र 2024 मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
Read Also :
- ‘एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं’
- महाराष्ट्र 5 टप्प्यात लॉकडाऊन हटणार, नियमावली जारी
- ‘मुंबई महापालिकेचे ग्लोबल टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती’
- भोसले समितीचा अहवाल सादर, मराठा आरक्षणाबाबत पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस
- सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले