मुंबई : पुरवठादारांकडून अटी शर्तीची पूर्तता न झाल्याने मुंबई पालिकेने लसीकरणासंदर्भातील ग्लोबल टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली. ग्लोबल टेंडर रद्द केल्याने आता भाजपने टीका केली आहे.
पालिकेच्या ग्लोबल टेंडरचा फुगा फुटला. पालिकेचे हे टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती, अशी जोरदार टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांन केली आहे.
अतुल भातखळकर म्हणाले की, पालिकेच्या ग्लोबल टेंडरचा फुगा फुटला. पालिकेचे हे टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती. जगातले अनेक देश लसीसाठी कंपन्यांना आगाऊ रक्कम देत असताना पालिका जाणीवपूर्वक ही रक्कम न देण्याचा हट्ट धरून बसली.कारण एकच त्यांना पैसा टाकायचा नव्हता लसी घ्यायच्या नव्हत्या. फक्त नौटंकी करायची होती.
पालिकेच्या ग्लोबल टेंडरचा फुगा फुटला. पालिकेचे हे टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती. जगातले अनेक देश लसीसाठी कंपन्यांना आगाऊ रक्कम देत असताना पालिका जाणीवपूर्वक ही रक्कम न देण्याचा हट्ट धरून बसली.कारण एकच त्यांना पैसा टाकायचा नव्हता लसी घ्यायच्या नव्हत्या. फक्त नौटंकी करायची होती.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 4, 2021
केंद्राने 45+ वयोगटासाठी दिलेल्या लशीतून सेलिब्रेटी आणि जवळच्या लोकांची सोय करणाऱ्या ठाकरे सरकारला आणि त्यांची सत्ता असलेल्या पालिकेला ग्लोबल टेंडरची केवळ धूळफेक करायची होती. हे जनतेच्याही आता लक्षात आलंय, अशी टीका भातखळकरांनी सरकारवर केली.
दरम्यान, ग्लोबल टेंडर अंतर्गत लस पुरवठा करण्यासाठी 9 कंपन्या पुढे आल्या होत्या. मात्र यातील एकही कंपनी पात्र न ठरल्याने अखेर टेंडर रद्द करण्यात आले आहे.
Read Also :
- भोसले समितीचा अहवाल सादर, मराठा आरक्षणाबाबत पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस
- सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
- ‘… तेव्हापासून मी सारखा झोपेतून उठतो आणि सरकार पडलं का काय पाहतो’
- ‘अंधेरी नगरी चौपट राजा अशी महाआघाडी सरकारची अवस्था’
- ‘वडेट्टीवारसाहेब तुमच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकत’