मुंबई : सह्याद्री अतिथीगृहात मुख्य सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळल्याची घटना समोर आली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आत बैठक घेत असतानाच बाहेर हा स्लॅब कोसळला. या ठिकाणी असलेल्या हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅबसह झुंबर अचानक कोसळल्यानं एकच खळबळ उडाली. यानंतर सह्याद्री अतिगृहात असलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर हलवण्यात आलं.
संध्याकाळी 4.45 मिनिटांनी सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले.
या घटनेत कोणीही जखमी झाले नसून, यावेळी सर्वजण सुरक्षित बाहेर पडले. हे बांधकाम 25 वर्ष जुने असल्याचे देखील सांगितले जात आहे.
फारच धक्कादायक व क्लेशदायक घटना आहे. आदित्य ठाकरे व बरोबरचे सर्व कर्मचारी सुखरूप आहेत हे महत्वाचे आहे. छत कोसळत आहे असे लक्षात आल्यावर प्रसंगावधान दाखवले गेले हे चांगले असले तरी या बांधकामाची व या घटनेची ऊच्चस्तरीय चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
Read Also :
- ‘… तेव्हापासून मी सारखा झोपेतून उठतो आणि सरकार पडलं का काय पाहतो’
- ‘अंधेरी नगरी चौपट राजा अशी महाआघाडी सरकारची अवस्था’
- ‘वडेट्टीवारसाहेब तुमच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकत’
- ‘घरीच थांबा, शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन’
- हर्षवर्धन पाटलांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट, मराठा आरक्षणाबाबत केली महत्त्वाची मागणी