सातारा : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेत मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली होती. यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याचे सांगितले जाते. तसेच, हर्षवर्धन पाटील यांनी आरक्षणाबाबत सरकारने तातडीने मार्ग काढावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण, पद्दोन्नती आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने मार्ग काढावा, अन्यथा समाजा- समाजात तेढ निर्माण होवू शकतो. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं होतं. आता आरक्षणाला वेळ लागत असेल तर मराठा समाजातील मुला-मुलींच्या नोकरी आणि शैक्षणिक सुविधेसाठी काही पर्यायी व्यवस्था करता येते का हे सरकारनं तातडीने पाहावं अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी आंदोलनात पुढाकार घेण्यात उदयनराजे तयार असल्याचे ते म्हणाले होते.
Read Also :
- ‘नुसती स्तुती करू नये, गडकरींसारखे कामही करावे’
- मंत्रिमंडळ बैठक: ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ 3 मोठे निर्णय
- बीकेसीतल्या कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधेवरून मनसे आक्रमक
- ‘मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही’
- लसीसाठी कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले ? किशोरी पेडणेकर म्हणतात… ‘तुझ्या बापाला’