मुंबई : लसींसाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढले होते. या अंतर्गत लस पुरवठ्यासाठी 9 कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. मात्र, लसीच्या कॉन्ट्रॅक्टबाबत एका ट्विटर यूजर्सनी विचारलेल्या प्रश्नावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतापलेल्या दिसल्या.
एका ट्विटर यूजरने लसीच्या पुरवठ्यासाठी कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले ? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर पेडणेकर यांनी थेट ‘तुझ्या बापाला’ अशा शब्दात उत्तर दिल्याने आता त्यांच्यावर टीका होत आहे.
The lady in below tweet is Mumbai Mayor @KishoriPednekar
When asked who got the Vaccination Contract in @mybmc
She answers "तुम्हारे बाप को "
This is an insult to all #Mumbaikars waiting for Vaccination #ShivSenaInsultsMumbaikars pic.twitter.com/nif3GztZi7
— Devang Dave (@DevangVDave) June 2, 2021
ग्लोबल टेंडर संदर्भात माहिती देणारे एक ट्विट पेडणेकर यांनी रिट्विट केले होते. या ट्विट खाली एका यूरने कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले असा प्रश्न विचारला होता. यावर पेडणेकर यांनी संतप्त होत जोरदार उत्तर दिले.
महापौरांनी खरोखर ही भाषा वापरली असेल तर दुर्दैवी आहे. विशेषतः नागरिकांबरोबर. तुम्हाला कुणी ट्रोल करत असेल तर दुर्लक्ष केलेलं बरं असतं पण या पदावर बसलेल्या लोकांनी भाषेचं औचित्य पाळायला हवं. pic.twitter.com/mml1LCDdiF
— Kaushal S Inamdar| कौशल इनामदार (@ksinamdar) June 2, 2021
पेडणेकर यांनी नंतर हे ट्विट डिलीट केले. मात्र तोपर्यंत याचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते. आता सोशल मीडियावर यावरून त्यांना ट्रोल केले जात आहे.
Read Also :
- ‘पंतप्रधान मोदींना मारण्याच्या कटात मला गोवण्याचा प्रयत्न केला गेला’
- काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेत्याचा मृत्यू
- ‘भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय’
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत, परिवहनमंत्र्यांची घोषणा
- ‘लोक मोदींकडे पाहून भाजपला मतदान करतात, शिवसेनेलाही बाळासाहेबांमुळेच सत्ता मिळाली’