मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केली आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्यां वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री ॲड. परब यांनी केली. त्याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढिवण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्याची राज्य सरकारने योजना घोषित केली होती. सरकारची ही योजना गेल्यावर्षी महामंडळाच्या वर्धापनदिनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली होती. या योजनेची मुदत ३० डिसेंबरपर्यंत होती. मात्र, शासनाने या योजनेचा कालावधी नंतर ३० जूनपर्यंत वाढवला, असे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कोरोना वॉरियर्स म्हणून एसटीचा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला होता. मात्र, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश देखील त्यांनी दिले.
Read Also :
- ‘लोक मोदींकडे पाहून भाजपला मतदान करतात, शिवसेनेलाही बाळासाहेबांमुळेच सत्ता मिळाली’
- ‘….तर ते पवारांना ओळखत नाहीत’, फडणवीस-पवार भेटीचा शिवसेनेकडून उलगाडा
- ‘मराठा आरक्षण आंदोलनात खासदार उदयनराजेंची पुढाकार घेण्याची तयारी’
- ‘चुकीचा आणि खोटा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही’
- लसीकरणातील अडचण दूर व्हावी यासाठी शरद पवार सीरम इन्स्टिट्यूटशी चर्चा करणार