मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यातील लसीकरण मंदावल्याचे दिसत आहे. लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः सीरम इन्स्ट्यिट्यूटशी लस पुरवठ्यासंदर्भात बोलणार आहेत.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, वरिष्ठ नेते यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोरोनावरील उपाययोजनासंबंधी जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. तसेच लसीकरण, आरक्षण, केंद्र सरकारचे धोरण, वर्धापन दिन यावर विस्तृत चर्चा झाली. या बैठकीनंतर बोलताना नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली.
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, वरिष्ठ नेते यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोरोनावरील उपाययोजनासंबंधी जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. तसेच लसीकरण, आरक्षण, केंद्र सरकारचे धोरण, वर्धापन दिन यावर विस्तृत चर्चा झाली – @nawabmalikncp pic.twitter.com/svBU2JkWBk
— NCP (@NCPspeaks) June 1, 2021
राज्यात लसीकरणाला गती मिळावी व लसीकरणातील अडचण दूर व्हावी यासाठी शरद पवार स्वतः सिरम इन्स्टिट्यूटशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच, म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्याबाबतही चर्चा झाली.
केंद्र सरकार बँकिंग ॲक्ट १९४९ मध्ये बदल करून सहकारी बँकेचे अधिकार काढून रिझर्व्ह बँकेकडे देण्याचा कट रचत आहे. राज्यातील जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका मोडीत काढण्याचा हा डाव महाविकास आघाडी सरकार मोडून काढेल, असेही ते यावेळी म्हणाले.
पक्षाचा 10 जून रोजी असलेला वर्धापन दिन कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करणार असल्याचे आजच्या बैठकीत ठरले. मंत्री आणि वरिष्ठ नेते आपापल्या जिल्ह्यातील पक्ष कार्यालयात झेंडावंदन करतील. प्रदेश कार्यालयात देखील मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
Read Also :
- ‘जिथे राणावत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो, त्या देशाचा जीडीपी वजा 7.3 जाणारच’
- अनिल परबांच्या अडचणी वाढण्याची शक्यता?, ‘त्या’ रिसॉर्टची चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
- ‘दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला ‘हे’ रिटर्न गिफ्ट दिले आहे’
- ‘…तेव्हा भाजपचे अतुल भातखळकर मनसेचे तिकीट मागायला आले होते’
- ‘मिळेल त्या वाहनाने राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर या’