मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली साई रिसॉर्ट घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरी जिलाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना दिले असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
अनिल परब दापोली साई रिसॉर्ट घोटाळाची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरी जिलाधिकारीनी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे
Anil Parab Dapoli Sai Resort scam probe ordered by Ratnagiri Collector, asked CEO Ratnagiri & SDO to investigate: @BJP4Maharashtra pic.twitter.com/K0chs93CBh
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 1, 2021
किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रार अर्जाला उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्या अर्जाला उत्तर देताना साई रिसॉर्टचे बांधकाम/बिनशेती परवानगी, रस्ता, घरपट्टी तसेच सीआरझेडचे उल्लंघन करून बेकायदेशीर बांधकामांमध्ये व फसवणुकीमध्ये सहभागी असलेल्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा अर्ज प्राप्त झाला होता. याबाबत चौकशी अहवाल मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अनिल परब हे आता दोनच महिन्याचे पाहुणे असल्याचे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले होते. अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचे ते म्हणाले होते.
Read Also :
- ‘दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला ‘हे’ रिटर्न गिफ्ट दिले आहे’
- ‘…तेव्हा भाजपचे अतुल भातखळकर मनसेचे तिकीट मागायला आले होते’
- ‘मिळेल त्या वाहनाने राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर या’
- ‘पेट्रोल-डिझेलची ‘शंभरी’ केल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन’, काँग्रेसचा पुणेरी टोला
- पहिल्यांदा संसदेत जाताना शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला