सातारा : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत आहे. एकीकडे खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला या मुद्यावरून आंदोलनाचा इशारा दिला असतानाच आता खासदार उदयनराजे यांनी देखील आंदोलनासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले हे देखील मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
माजी सहकारमंत्री श्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.@Harshvardhanji pic.twitter.com/GQny77B2BT
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) June 1, 2021
मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय झालेला आहे. या संदर्भात आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर आंदोलनबाबत पुढाकार घेण्यास उदयनराजे तयार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला 6 जूनपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य न केल्यास रायगडावरून आंदोलनला सुरूवात करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
Read Also :
- ‘चुकीचा आणि खोटा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही’
- लसीकरणातील अडचण दूर व्हावी यासाठी शरद पवार सीरम इन्स्टिट्यूटशी चर्चा करणार
- ‘जिथे राणावत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो, त्या देशाचा जीडीपी वजा 7.3 जाणारच’
- अनिल परबांच्या अडचणी वाढण्याची शक्यता?, ‘त्या’ रिसॉर्टची चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
- ‘दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला ‘हे’ रिटर्न गिफ्ट दिले आहे’