श्रीनगर : जम्मू-काश्मिरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भाजप नेत्याचा मृत्यू झाला आहे. राकेश पंडित असे या भाजप नेत्याचे नाव आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार करत त्यांना ठार केले.
राकेश पंडित हे त्राल नगरपालिकेच्या समितीचे अध्यक्ष आणि पुलवामा जिल्हा भाजप युनिटचे सचिव होते. राहत्या घराबाहेर त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
Despite being provided with 2 PSOs & secured hotel accommodation in Srinagar, the said councillor went to Tral without PSOs. Area cordoned off & search is underway: Kashmir IG Vijay Kumar
— ANI (@ANI) June 2, 2021
राकेश पंडित यांना श्रीनगरमध्ये 2 पीएसओ व हॉटेल बाहेर सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र, असे असताना देखील ते सुरक्षा न घेताच त्राल गेले होते. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. या घटनेत राकेश यांच्या मित्राची मुलगी देखील जखमी झाली असून, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले. सुरक्षा दल आणि पोलिसांच्या पथकाकडून या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
Read Also :
- ‘भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय’
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत, परिवहनमंत्र्यांची घोषणा
- ‘लोक मोदींकडे पाहून भाजपला मतदान करतात, शिवसेनेलाही बाळासाहेबांमुळेच सत्ता मिळाली’
- ‘….तर ते पवारांना ओळखत नाहीत’, फडणवीस-पवार भेटीचा शिवसेनेकडून उलगाडा
- ‘मराठा आरक्षण आंदोलनात खासदार उदयनराजेंची पुढाकार घेण्याची तयारी’