नांदेड : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानीही ते गेले. यावरून फडणवीस एक दिवस मातोश्रीवर देखील येतील, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर आता फडणवीसांनी उत्तर दिले आहे.
‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिले आहे.
फडणवीसांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना त्यांनी आपण शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटलो. ही एक सदिच्छा भेट होती, असे स्पष्ट केले होते.
दरम्यान, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते आशिष शेलारांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी सुद्धा संजय राऊतांचं ते वाक्य ऐकलंय, आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं वाक्य म्हणजे आमंत्रणाचा एक प्रकार आहे. आमंत्रण आम्ही स्वीकारलं आहे’, असे ते म्हणाले.
Read Also :
- लसीसाठी कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले ? किशोरी पेडणेकर म्हणतात… ‘तुझ्या बापाला’
- ‘पंतप्रधान मोदींना मारण्याच्या कटात मला गोवण्याचा प्रयत्न केला गेला’
- काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेत्याचा मृत्यू
- ‘भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय’
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत, परिवहनमंत्र्यांची घोषणा