नांदेड : कोरोना व्हायरस महामारीविरोधातील लढ्यात केलेल्या कामगिरीमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून देखील त्यांचे कौतुक केले जात आहे. नितीन गडकरी म्हणजे ‘ चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस’ असे त्यांचे वर्णन करावे लागेल, असे मत काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले होते. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक चव्हाणांनी केवळ नितीन गडकरींची स्तुती करू नये, तर त्यांच्या सारखे काम देखील करावे, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी चव्हाणांना दिला आहे.
फडणवीस नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोविड केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी अशोक चव्हाणांना सल्ला दिला.
फडणवीस म्हणाले की, आमच्या नेत्याचे काम सगळ्यांना आवडते ही चांगली गोष्ट आहे. माझा अशोकरावांना सल्ला आहे, त्यांनी नुसती स्तुती करू नये. त्यांच्यासारखे काम करावे. तुमचीही स्तुती होईल, असा सल्ला त्यांनी दिला.
Read Also :
- मंत्रिमंडळ बैठक: ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ 3 मोठे निर्णय
- बीकेसीतल्या कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधेवरून मनसे आक्रमक
- ‘मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही’
- लसीसाठी कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले ? किशोरी पेडणेकर म्हणतात… ‘तुझ्या बापाला’
- ‘पंतप्रधान मोदींना मारण्याच्या कटात मला गोवण्याचा प्रयत्न केला गेला’