काल झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला यावेळी त्यांनी मुख्यंमत्री हे फक्त मातोश्रीपुरतेच मर्यादित आहेत त्यांना जनतेची काळजी नाही. या महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही म्हणून आम्ही रहस्थपती राजवटीची मागणी करत होतो आणि अजून पण करतो असे पुनरुच्चार केले होते यावरून आता काँग्रेसने नारायण राणे यांना वेठीस धरले आहे
खासदार नारायण राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. राणेंच्या खांद्यावरुन मागणी करण्याऐवजी भाजपने खुलेआम सांगावे, असे आवाहन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले.
राष्ट्रपती राजवटीची नारायण राणे यांची मागणी वैयक्तिक आहे. भाजपची ती अधिकृत मागणी नाही, असे सुधीर मुनगंटीवार सांगत होते. आता तीच मागणी राणेंनी भाजप कार्यालयातून केली आहे. भाजप नारायण राणे यांचा खांदा का वापरत आहे? खुलेआम ‘मन की बात’ सांगा. लोकांना तुमचा कुटील डाव कळू तर दे” असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले
राष्ट्रपती राजवटीची राणेसाहेबांची मागणी वैयक्तिक आहे. @BJP4Maharashtra ची ती अधिकृत मागणी नाही असे @SMungantiwar सांगत होते.
आता तीच मागणी राणेसाहेबांनी भाजपा कार्यालयातून केली आहे. #भाजपा, राणे साहेबांचा खांदा का वापरता? खुलेआम #मन_की_बात सांगा. लोकांना तुमचा कुटील डाव कळू तर दे— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 6, 2020