नवी दिल्ली : राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले. संभाजीराजे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. संभाजीराजे आणि संजय राऊत यांच्यात झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवादही साधला आहे.
मोठी बातमी: नितेश राणेंच्या छातीतील दुखणे वाढले, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातून कोल्हापूरला हलवलं
तीन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर आता संभाजीराजे हे संजय राऊत यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
किशोरी पेडणेकरांना देवेंद्र फडणवीसांनी दिली लिफ्ट; गोवा ते मुंबई प्रवासाची राज्यभर चर्चा
खासदार संभाजी छत्रपती आज अचानक संजय राऊत यांच्या निवासस्थानी आले. या दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राऊत माझे जुने दोस्त आहेत. दरवर्षी ते मला आणि शरद पवारांना जेवायला सुद्धा बोलावतात. आज त्यांच्यासोबत चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून त्यांच्या घरी आलो. बाकी काही विषय नाही. एक खासदार दुसऱ्या खासदारा भेटू शकतो हेच दिल्लीचं वैशिष्ट्ये आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
अजरामर गाण्यांमुळे लतादिदी सदैव आपल्यासोबत असतील – चंद्रकांत पाटील
मराठा आरक्षणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अनेक गोष्टी अडचणीत आहेत. पाच मूलभूत प्रश्न राज्य सरकार सोडवू शकतात ते सोडवू शकले नाहीत. त्या संदर्भात मराठा संघटना लवकर निर्णय घेतील. ते जे निर्णय घेतात त्यानुसार मी चालतो, असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, मी मुख्यमंत्र्यांना नेहमीच भेटतो. त्यांना हा विषय माहीत आहे. त्यांना विषय कळवलेला आहे, असं त्यांनी सांगितलं.
Read also:
- पुन्हा भिर्रर्र… आंबेगाव तालुक्यात शिवाजीराव आढळरावांनी केले बैलगाडा शर्यतीचे आयोजन
- नितेश राणेंना काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची – प्रवीण दरेकर
लतादीदींच्या अंत्यसंस्काराला काँग्रेस नेते का नव्हते? नाना पटोलेंनी सांगितलं कारण - एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री; ठाण्यातील कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरबाजीची राज्यभर चर्चा
- बाबूश यांच्या पावलावर पाऊल ठेऊनच जोशुआचं मार्गक्रमण – सदाभाऊ खोत