IMPIMP

या देशात कोणीही सेक्युलर नाही – संजय राऊत

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने ‘शट अप यार कुणाल’ या पॉडकास्ट मध्ये घेतलेली मुलाखत यू ट्यूबवर प्रसारित झाली आहे. कुणाल कामराने कंगना रनौत, सुशांत सिंह राजपूत, भाजप यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी देशातील धर्मनिरपेक्षतेवर देखील भाष्य केले आहे.

या देशात कोणीही सेक्यूलर होऊ शकत नाही, असे मत संजय राऊत यांनी पॉडकास्टमध्ये व्यक्त केले आहे. संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशात कोणीही सेक्युलर नाही. या देशात कोणीही सेक्युलर होऊ शकत नाही. जे सेक्युलर असल्याचं म्हणातात तेच सर्वाधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एकप्रकारची शिवी आहे. त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर राजकारणात करण्यात आला आहे.

सेक्युलर या शब्दामुळे देशात हिंदू मुस्लीम अशी सरळ विभागणी झाली. तुम्ही केवळ हिंदूंना शिव्या दिल्यानं तुम्ही अधिक सेक्युलर असल्याचं म्हटलं जातं. हे चुकीचं आहे, असे परखड मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.