मुंबई : संजय राऊतांना भाजपवर दिवसभरातून १० वेळा टिका केल्याशिवाय झोपच लागत नाही ! उद्धवजींना कोणी काही बोलले की राऊत बोलत नाही, पण पवारांवर बोलल्यावर मात्र राऊत बोलतात. राऊतांच पवारांवर जास्त प्रेम आहे. ‘उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवारांवर संजय राऊतांच प्रेम अधिक’ असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
आज शिवसेना आमदार प्रताप सरदेसाई यांच्या घरात ईडी ची धाड पडल्याने भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकून जोरदार टीका करत आहे. संजय राऊतांनी भाजपला लक्ष्य करताना म्हटलंय कि आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, तर त्याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईच समर्थन केलं आहे.
उद्या जयंत पाटील यांचा ‘जपा’, शरद पवार यांचा ‘शपा’ किंवा उद्धव ठाकरे यांचा ‘उठा’ असा उल्लेख व्हायला लागला, तर…, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी चिमटा काढला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो म्हणून ‘चंपा’ असं संबोधणे अयोग्य आहे.
उद्या जयंत पाटील यांचा ‘जपा’, शरद पवार यांचा ‘शपा’ किंवा उद्धव ठाकरे यांचा ‘उठा’ असा उल्लेख व्हायला लागला, तर हे सुसंस्कृत राजकारणात बसणारे ठरणार नाही. त्यामुळे असे प्रकार टाळले पाहिजेत. यावेळी बोलताना पाटील यांनी पुन्हा एकदा महविकास आघाडी सरकार अंतर्गत कलहातूनच पडेल, असा दावा केला आहे.
Read Also :
लग्न एकासोबत लफडं दुसऱ्यासोबत मनसेची शिवसेनेवर खोचक टीका
‘वर्षभरापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडी सरकार आलं आणि टिकलं’
निलेश राणे म्हणतात…“ठाण्यातील शिवसेनेच्या सगळ्याच आमदार, खासदारांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले”
‘आम्ही मास्क घालण्याचं आवाहन करतो तर दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करतायत’
“प्रताप सरनाईक यांच्याविरोधात दडपशाही सुरु आहे, ही झुंडशाही आहे; शिवसेना सरनाईकांच्या पाठीशी”
‘सरनाईक, वायकर हा तर मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये’ राणेंचा ठाकरेंवर निशाणा