राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ताने उद्धव ठाकरे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रात्री बरोबर 12 वाजता मुख्यमंत्र्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहे. मात्र शुभेच्छा देताना शेअर केलेल्या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही नेते एका गाडीत बसलेले दिसत आहे. या गाडीचे स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात आहे.
संजय राऊत यांनी अजित पवार यांनी शेअर केलेल्या या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत म्हणाले, “छायाचित्रात स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो.”