मुंबई – प्रताप सरनाईक यांच्या भोवती आदींचा ससेमिरा चालू आहेत त्यातच त्यांच्यावर अनेक आरोप लगावले जात आहे. काळ सरनाईक यांनी प्रतिकारणसमोर काही खुलासे केले त्यातच अभिनेत्री कंगना रानौत हिने देखी सरनाईक यांच्यावर काही आरोप केले होते
प्रताप सरनाईक यांच्या घऱी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला आहे. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली
तसेच यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे त्यांचे नाव घेत एक विधान केले होते त्यावर आता भाजपने आक्षेप घेत सरनाईक यांचा जाहीर निषेध केला आहे. ” नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बद्दल आपली पातळी सोडून बोलणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्वरित आमदारकीचा राजीनामा द्यावा.” अशी मागणी भाजपकडून होत आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर त्यांचा विधानाचा व्हिडीओ टाकत त्यावर निषेध व्यक्त केला आहे.
या व्हिडिओमध्ये त्यांनी “मी धारातीर्थ पडणारा तानाजी मालुसरेंसारखा सैनिक नई मी बाळासाहेबानाचा शिवसैनिक आहे. अजून पुढं काही अडचणी असतील त्याला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे” असे खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर भाजपने आक्षेप घेत राजीनामेचि मागणी केली आहे.
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बद्दल आपली पातळी सोडून बोलणाऱ्या शिवसेना आमदार @PratapSarnaik यांनी त्वरित आमदारकीचा राजीनामा द्यावा. pic.twitter.com/R03SOkEwPE
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) December 14, 2020