नवी दिल्ली : तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी आज भारतात दाखल झाली. गुजरातमधील जामनगर एअरबेसवर ही विमानं उतरली. यापूर्वी पंजाबमधील अंबालामध्ये पाच राफेल विमानांची पहिली बॅच दाखल झाली होती. भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं खरेदी केली आहेत. ती टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होत आहेत. आत्तापर्यंत एकूण आठ विमानं भारतात आली आहेत.
भारतात तीन राफेल विमाने दाखल झाल्यामुळे आता भारतीय वायुसेनेकडे एकूण आठ राफेल विमाने झाली आहेत. यापूर्वी २९ जुलै रोजी पाच राफेल लढाऊ विमानांची बॅच भारतात दाखल झाली होती. ही विमाने १० सप्टेंबर रोजी अंबाला येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘गोल्डन एरोज स्क्वॉड्रन’मध्ये सहभागी झाली होती.
दरम्यान, हवाई दलाच्या माहितीनुसार आज आलेल्या तीन राफेल विमानांनी मध्ये कुठलाही थांबा घेतला नाही. प्रवासादरम्यान फ्रान्सच्या आणि भारताच्या विमानांद्वारे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. हवाई दलाला प्रत्येक दोन महिन्यांनंतर तीन ते चार राफेल विमानं दिली जाणार आहेत.
Read Also