मुंबई : काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात भाजपनं आपल्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याची अट ठेवल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत भाजपचा असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, सौदेबाजी करणारी नाही, असं खणखणीत उत्तर फडणवीस यांनी दिलंय.
२०२२ च्या महापालिका निवडणुकासाठी 3 सदस्यांचा प्रभाग होणार; राज्य मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय
बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी भेट घेतली. त्यांनी विनंती केली की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यावर मी त्यांना सांगितलं की आमची कोअर कमिटी, आमचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करतील आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत चर्चा नाही. भारतीय जनता पार्ट सौदेबाजी करत नाही. काही पत्रकारांना अलीकडच्या काळात पतंग उडवायची सवय झाली आहे. आमच्या 12 आमदारांचं निलंबन हे नियमबाह्य आहे. आम्ही त्याबाबत कोर्टात गेलो आहोत. आम्ही कोर्टातही लढाई लढू आणि बाहेरही लढू. आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, सौदेबाजी करणारे आम्ही नाही, असं फडणवीस म्हणाले.
मी कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही, सोमय्या विनाकारण प्रतिमा मलिन करतायतं – अनिल परब
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे. काँग्रेसनं भाजपसमोर लोटांगण घातलं अशी चर्चा सुरु असल्याचं पत्रकार म्हणाले. त्यावेळी लोटांगण नाही किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज नाही. याबाबत सर्वांना माहिती होती. ही परंपराच आहे. त्याचबरोबर आम्हाला निवडणूक जिंकण्याची पूर्ण खात्री आहे. मात्र, महाराष्ट्राची परंपरा, जो प्रघात आहे तो कायम राहावा म्हमून फडणवीसांची भेट घेतली. ती दोघांचीही जबाबदारी आहे, असं थोरात म्हणाले.
Read Also :
- ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा
- भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात बलात्काराचा प्रयत्न; ताईगिरी करणाऱ्या चित्रा वाघ आता कुठे आहेत?
- लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? प्रभाग रचनेवरून राज ठाकरेंचा संताप
- भाजप आमदार जगतापांनी शिवसेनेला दाखवला ट्रेलर: पिंपरी चिंचवडच्या दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश
- राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करा: काँग्रेस नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला