मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग करुन बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी पुढे येता आता गप्प का? भाजपच्या महिलांची आता ताईगिरी गेली कुठे? असा सवालही महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, इतर घडलेल्या घटनांवर भाजपच्या महिला राजकारण करतात. स्वत:च्या दिव्याखाली अंधार. जेव्हा तुमच्याच ऑफिसमध्ये अशा घटना घडतात तेव्हा तुमची ताईगिरी जाते कुठे? दरवेळेला राज्याला बदनाम केलं जातं. मी काही तरी वेगळं करते असे ताईगिरी दाखवता, पब्लिसीटी स्टंट करण्यासाठी पुढे येता आता गुपचिळी का? ताईगिरी करत होत्या त्यांचा फोन आता बंद असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवारांनी नव्हे काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला – रामदार आठवले
मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाची घटना ताजी असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील भाजपच्या नगरसेविकेच्या कार्यालयातच एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या नगरसेविकेच्याच कार्यालयात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मी कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही, सोमय्या विनाकारण प्रतिमा मलिन करतायतं – अनिल परब
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली परिसरातील एका भाजपच्या नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेवर भाजप कार्यकर्त्याने बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही तर तक्रार दाखल करुनही पोलिसांनी महिनाभर दखल घेतली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अखेर आता बोरिवली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पीडित महिला एक समाजसेविका आहे. ही महिला भाजपच्या कार्यालयात काही कामासाठी गेली होती त्यावेळी आरोपीसोबत तिची ओळख झाली. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी पीडित महिला भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात गेली असता आरोपीने कार्यालय बंद करुन पीडित महिलेचा विनयभंग करुन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.
Read Also :
- लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? प्रभाग रचनेवरून राज ठाकरेंचा संताप
- भाजप आमदार जगतापांनी शिवसेनेला दाखवला ट्रेलर: पिंपरी चिंचवडच्या दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश
- राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करा: काँग्रेस नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
- भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार करावी; प्रवीण दरेकरांना इशाऱ्याला दादाचं रोखठोक उत्तर
- मुंबै बँकेत घोटाळा: अजित पवारांच्या जवळचे ६ संचालक सामील – प्रवीण दरेकांचा दावा