IMPIMP

‘या’ कारणासाठी शरद पवार यांचा आज अन्नत्याग

 

मुंबई : राज्यसभा आणि लोकसभेत प्रचंड  गदारोळानंतर  कृषी  विधेयक काल मंजूर  करण्यात आले.  या विधेयकाला काँग्रेसने  जोरदार  विरोध  केला होता. ज्या  खासदारांनी काल गदारोळ केला  यावर  त्यांच्याविरोधात  निलंबनाची  कारवाई करण्यात आली.मात्र आम्ही त्या निलंबन केलेल्या खासदारांसोबत आहोत असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

राज्यसभेत गोंधळ घातल्याने आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत निलंबन मागे घेतलं जात नाही तोपर्यंत राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सभागृहात बोलताना ही माहिती दिली. तर, सभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षांना आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केलेली आहे.

कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदारांनी अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शरद पवार यांनी खासदारांना आपले समर्थन दिले आहे.

Read Also