नागपूर : अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. आता दोन्ही गटाकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. तर अनेक नेते पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच निवडणुकीपुर्वी अनिल देशमुख अजित पवार गटात दाखल होणार आणि ते कटोल मतदारसंघातून निवडणुक लढविणार असं विधान अजित पवार गटाचे नेते प्रशांत पवार यांनी केलं आहे. त्यावर आता अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“देव आमचा जुगार खेळतो, भारतरत्न परत करा” , तेंडूलकराच्या घरासमोर बच्चू कडूंचं जोरदार आंदोलन
प्रशांत पवारला समजायला पाहिजेत, दुनियेला माहितीय की मी शरद पवार यांच्या अतिशय जवळचा आणि शेवटपर्यंतसोबत राहणारा आहे. त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही. सगळ्यांना माहितीय मी शरद पवार साहेबांचा खंदा समर्थक आहे. मी त्यांची साथ सोडणार नाही. असं अनेल देशमुख यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“अजित दादांच्या दादागिरीला ठाण्याच्या भाईंचा लगाम..!” वडेट्टीवारांनी अजित पवारांना डिवचलं
दरम्यान, अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्या गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केल्याने नागपूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. कटोलची जागा भाजप स्वत:कडे ठेवणार की अजितदादा गटाला देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“विश्वगुरू अन् भाजप-आरएसएसच्या गुंडांनी प्रश्नांची उत्तरं द्या,” प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर संताप
हेही वाचा…“राज्यातील महसुल अधिकारीच सुरक्षित नाहीत? ऑफिसमधील छत कोसळलं,” वडेट्टीवारांचा सरकारवर संताप
हेही वाचा…झुनका भाकर, पुरणपोळी, वडापाव अन् बरच काही., इंडियाच्या बैठकीसाठी खास मेन्यू, महाराष्ट्रीय पदार्थांचा समावेश
हेही वाचा…“सत्ता नहीं, पार्टी नहीं, तभी उद्धव ठाकरे का इतना डर”, दानवेंनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय पुन्हा लांबणीवर, कोर्टाकडून ‘ही’ नवीन तारिख जाहीर