मुंबई : भारताच्या शेजारील चीन देशाने आपल्या देशाचा नवीन नकाशा जाहीर केला आहे. या नकाशात चीनने भारतील अरूणाचल प्रदेशाचा भाग आपल्या नकाशात दाखवला आहे. यावरून चीन भारतात घुसखोरी करत भारताची जमीन बळकवतांना दिसत आहे. यावरून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टिका केलीय.
हेही वाचा…“अजित दादांच्या दादागिरीला ठाण्याच्या भाईंचा लगाम..!” वडेट्टीवारांनी अजित पवारांना डिवचलं
प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणावरून मोदींना प्रश्न विचारले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की मोदी स्वतःला विश्वगुरू म्हणतात. त्यांना हा भ्रम असण्यात मला काहीच अडचण नाही पण, ते खरंच विश्वगुरू असतील तर त्यांनी आणि भाजप-आरएसएसच्या त्यांच्या गुंडांनी ह्या प्रश्नांची उत्तरे द्यावी.
हेही वाचा…“बंडखोरांना आगामी निवडणुकीत जागा दाखवली जाईल,” शरद पवारांनी अजित पवार गटाविरूद्ध दंड थोपटलं
चीनने नकाशा प्रकाशित करून अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला स्वतःचा भाग दाखवले आहे. विश्वगुरूच्या राज्यात भारताची भूमी चीनमध्ये का दाखवली जातेय?अरुणाचल प्रदेशातील जागांचे नाव चीन का बदलतेय? भारताने विरोध करूनही BRICS चा विस्तार करण्यात आला हे खरे आहे की नाही? तुमचा विश्वगुरूचा शिक्का बिनकामाचा आणि नावापुरताच आहे का? या विस्तारामुळे भारतापेक्षा चीनची ताकद वाढली नाही का? प्रत्येक घुसखोरीत चीन आपली जमीन बळकावते. BRICS च्या भेटीमध्ये चीनच्या वाढत्या घुसखोरीबद्दल चर्चा केली का? तिबेटला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता का देत नाही? चीनवर तुमची भूमिका इतकी नरम का? त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक का करत नाही? तुमचा जोश आता हाय नाही का? की २०१४ च्या निवडणुकीत भाजप-आरएसएसने चिनी कंपन्यांकडून घेतलेला राजकीय निधी वापरल्या म्हणून? असे सवाल प्रकाश आंबेडकरांनी विचारले आहेत.
मोदी स्वतःला विश्वगुरू म्हणतात. त्यांना हा भ्रम असण्यात मला काहीच अडचण नाही पण, ते खरंच विश्वगुरू असतील तर त्यांनी आणि भाजप-आरएसएसच्या त्यांच्या गुंडांनी ह्या प्रश्नांची उत्तरे द्यावी.
1️⃣ चीनने नकाशा प्रकाशित करून अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला स्वतःचा भाग दाखवले आहे.…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यातील महसुल अधिकारीच सुरक्षित नाहीत? ऑफिसमधील छत कोसळलं,” वडेट्टीवारांचा सरकारवर संताप
हेही वाचा…झुनका भाकर, पुरणपोळी, वडापाव अन् बरच काही., इंडियाच्या बैठकीसाठी खास मेन्यू, महाराष्ट्रीय पदार्थांचा समावेश
हेही वाचा…“सत्ता नहीं, पार्टी नहीं, तभी उद्धव ठाकरे का इतना डर”, दानवेंनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय पुन्हा लांबणीवर, कोर्टाकडून ‘ही’ नवीन तारिख जाहीर
हेही वाचा…“देव आमचा जुगार खेळतो, भारतरत्न परत करा” , तेंडूलकराच्या घरासमोर बच्चू कडूंचं जोरदार आंदोलन