मुंबई: संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाला एकत्रित आणण्यासाठी ब्रेकफास्ट डिप्लोमासीचा अवलंब केला आहे. मोदी सरकार घेरण्यासाठी काँग्रेससह १४ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र यातच दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची परवा भेट झाली.
हे पण वाचा: ‘ज्यांनी भाजपला सोडले त्यांची वाईट परिस्थीती झाली’, शेलारांचा एकनाथ खडसे यांना टोला
शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये पुन्हा एकदा भेट होणार असल्याचे बोलले जात आहे. पुढील महिन्यात अमित शहा पुण्यात येत आहेत. शहा त्यांच्या एका नियोजित कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत. याच दौऱ्यात शहांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट द्यावी असा आग्रह पवारांनी केल्याचं समजतं.
हे पण वाचा: “घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीबाबत केंद्राने चालू अधिवेशनात स्पष्टीकरण करावे”, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अमित शहा पुण्यात येणार आहेत. त्यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रमात पुण्यात आहेत. याची कल्पना असल्यानं पवारांनी शहांना जिल्ह्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिलं. त्यावर शहांनी होकार दर्शवला. त्यामुळे पुढील महिन्यात पुन्हा एकदा पवार आणि शहांची भेट होण्याची दाट शक्यता आहे.
हे पण वाचा: ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये; पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं
गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्ताराआधी सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली. त्याची जबाबदारी अमित शहांकडे आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट साखर क्षेत्रातील देशामधील एक प्रमुख संस्था आहे. साखर क्षेत्राचे प्रश्न जाणून घेण्यासाठी इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या, अशा स्वरुपाचं निमंत्रण पवारांनी शहांना दिलं आहे.
शहा-पवारांमध्ये १५ मिनिटं बंद दाराआड स्वतंत्र बैठक
शहा-पवारांमध्ये १५ मिनिटं बंद दाराआड स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत राज्य आणि देशातील राजकीय परिस्थितीवर, राज्यातील पूरपरिस्थितीवर तसेच, पेगासस प्रकरणाबाबत पवारांनी आपली भूमिका शहांकडे मांडली असून, त्यांनीही सरकारची भूमिका त्यांना सांगितल्याचं समजतं. मात्र, याबाबतच्या वृत्ताला कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नसून, या बैठकीतील चर्चा गुलदस्त्यात असल्याने त्याबाबत वेगवेगळे कयास लढवले जात आहेत.