मुंबई : दोन दिवसांपूर्वीच माथेरान नगरपालिकेत सेनेचे १० नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची घटना घडली असतानाच, आता भिवंडीत सेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेनेचे नेते सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी शिवसेना पक्ष सदस्य पदासोबतच जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला असून, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.
सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात वरचष्मा असलेल्यांपैकी एक आहेत. त्यांनी शिवसेनेकडून माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती म्हणून काम पहिले आहे. दरम्यान, त्यांनी आपला राजीनामा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे शनिवारी दिला आहे.
दरम्यान, २०१४ ची लोकसभा निवडणूक मनसेकडून लढवल्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात जाहीरपणे उघड भूमिका घेतल्याने, पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत तब्बल २ वर्षे त्यांना निर्णयप्रक्रियेतून दूर सारले होते. पक्षाच्या या दुर्लक्षित धोरणामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये देखील प्रचंड नाराजी होती. आज अखेर त्यांनी, वैयक्तिक कारण देऊन आपला राजीनामा दिला.
तसेच, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुरेश म्हात्रेंच्या घरी आले होते, तेव्हापासूनच सुरेश म्हात्रे हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे आता ते काँग्रेससोबत घरोबा करणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशीही एक अटकळ आहे की; आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा राजीनामा दिला आहे.
Read Also :
- ‘आरक्षणाला जबाबदार ठाकरे सरकारच, त्यांच्याच अर्ध्या मंत्र्यांना आरक्षण नकोय!’
- ‘राज्याच्या राजकारणात आता शिळेपणा आलाय; संभाजीराजेंनी पुढाकार घेऊन तो दूर करावा’
- ‘माझ्यावरील आरोप सूडबुद्धीने; आघाडी सरकारला हा बदनाम करण्याचा प्रयत्न’
- पावसाळ्यात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता, काळजी घ्या! – मुख्यमंत्री
- ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाला ठाकरे सरकारच जबाबदार – अनिल बोंडे