मुंबई : दीड वर्षांपासून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपायचे नाव घेत नाहीये. आता राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात पैश्यांची मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचा आरोप करण्यात आला असून, ठाकरे सरकारच्या अडचणींमध्ये त्यामुळे अजून वाढ झाली आहे. नाशिक मधील आरटीओतील निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी हा आरोप केला असून, यामध्ये त्यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह राज्यातील इतर ६ बड्या अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत.
या प्रकरणी निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी, परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील या ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात, नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी, तसेच इतर व्यवहारात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत केला आहे. तसेच, आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा बदलीचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी या तक्रारीत केला आहे.
दरम्यान, यानंतर तातडीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी ट्विटर वरून ट्विट्सची मालिका करत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून, “मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून, उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे,” असा आरोप त्यांनी तक्रारदार निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केला आहे.
मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून, उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे.
— Anil Parab (@advanilparab) May 29, 2021
तसेच, “विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे. निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे.
— Anil Parab (@advanilparab) May 29, 2021
या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल.
— Anil Parab (@advanilparab) May 29, 2021
Read Also :
- ठाकरे सरकारच्या नाकार्तेपणामुळे OBC समाजावर पुन्हा अन्याय – देवेंद्र फडणवीस
- १०० कोटींची महावसुली आता ३०० कोटींवर? गृहमंत्रीसाहेब निष्पक्ष चौकशी करा!
- ‘सत्तेसाठी मती गेली’, आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे तरी आता कोडगेपणाने सांगू नका
- शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
- ‘कोरोना संकटात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत’