मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. यात सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांकडे असणार आहे. तर, विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांत गोव्याचाही समावेश असून, गेल्या दोन ते तीन दिवसांतील घडामोडीनंतर राजकीय मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. तसेच गोव्यातील राजकारण तापतानाही पाहायला मिळत आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री फालेरो यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत गोव्यात दाखल होत आहेत. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत गोवा दौऱ्यावर निघाले आहेत. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याने तिकडे चाललो आहे. बाळासाहेब ठाकरेही तिकडे प्रचारासाठी गेले होते. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार; चिपी विमानतळाचं उद्घाटनं मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच
संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. गोव्यात कॅसिनोचा, जुगाराचा कहर आहे. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करतच भाजप तिकडे सत्तेवर आली. मात्र, त्या सगळ्याला आता भाजपचा पाठिंबा आहे. कोरोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजप फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांची आज ईडी चौकशी; स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मुलींची घातली शपथ
आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही. भाजप कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ते कोणावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. भाजपने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करू शकते. आमचे गोव्यात प्राबल्य आहे. कोणासोबत युती किंवा आघाडी झाली तर ठीक, नाहीतर आम्ही स्वबळावर लढू, असे संजय राऊत म्हणाले.
Read Also :
- एसटी पुरात बुडाली, तीन जन मेले, चालक बेपत्ता झाला; तरीही पालकमंत्री अजूनही वाऱ्यावरच
- पावसाने सगळ उद्धस्त केलं, राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा – नाना पटोले
- नाशिककरांना सतर्कतेचा इशारा: गंगापूर, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले, अनेक गावांत पाणी शिरण्याची शक्यता
- शिवसेना खासदार भावना गवळींवर अटकेची टांगती तलवार; ED ने पाठवली आणखी एक नोटीस
- कुणीही उठावं आणि चिखलफेक करावी हे सहन करणार नाही – हसन मुश्रिफ