मुंबई : शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने समन्स पाठवलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा भावना गवळी यांच्याकडे वळवला आहे. खासदार गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भावना गवळी यांच्यावर नेमके आरोप काय?
भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.
शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा
भावना अॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता. मनी लाँडरिंग अर्थात पैशांच्या अफरातफरी प्रकरणात भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. . त्यांना ईडी कोर्टात हजर केलं असता 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
Read Also :
- कुणीही उठावं आणि चिखलफेक करावी हे सहन करणार नाही – हसन मुश्रिफ
- सोमय्याची तक्रार स्वीकारणारे पोलिस अधिकारी आर. आर. पाटीलाचे सख्खे भाऊ; मुश्रीफांवर कारवाई करणार?
- जयंत पाटील आले, पण एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत – पंकजा मुंडे
- मराठवाड्यात ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस; शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावला
- आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात, चार महिन्यात अर्धे मंत्री रुग्णालयात दाखल होतील – सोमय्या