मुंबई : ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर आता शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब चौकशीसाठी हजर राहणार आहेत. माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी ही माहिती दिली. आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्यानं आज ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
आरोग्य विभागाची स्थगित झालेली परीक्षा ‘या’ दिवशी; राजेश टोपेंनी सांगितली तारीख
अनिल परब म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलींची शपथ घेऊन सांगत आहे की कोणत्याही गैरव्यवहारात आपला हात नाही. आपल्याला ईडीने का बोलावलं आहे याची माहिती नाही. या चौकशीदरम्यान जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर आपण देणार आहोत. ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. नेमक्या कोणत्या कारणासाठी आपल्याला चौकशीला बोलावलं आहे हे आपल्याला माहिती नसून ईडीला या प्रकरणी आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.
राजसाहेब, भाजपशी युती करा, निवडणुकीत फायदा होईल; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनिल परब मुंबई आणि ठाण्यातील पोलीस दलातील बदल्या करत होतं, असं सांगितल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून 50 कोटी रुपये वसूल करण्यासाठी अनिल परब यांनी सांगितलं होतं, असा दावाही सचिन वाझे यांनी पत्र लिहून केला होता.
काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजपाची माघार; राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. अनिल देशमुखांच्या नंतर शिवसेना नेते अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांना ईडीने नोटिस पाठवली आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांच्या वर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर अनिल परब यांनी न्यायालयात 100 कोटी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
Read Also :
- शिवसेना खासदार भावना गवळीच्या अडचणी वाढल्या; निकटवर्तीय सईद खानला ईडीकडून अटक
- धनंजय मुंडेंना पुढील 10 निवडणुकांमध्ये परळीत कोणीही रोखू शकणार नाही – जयंत पाटील
- मोठी बातमी! प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पुराच्या पाण्यात गेली वाहून
- मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचे काहीच चालत नाही; अजित पवारांची मिश्किलपणे नाराजी व्यक्त
- पुणे महापालिकेच्या मामाराव दाते मुद्रणालयात दारुच्या पार्ट्या; सुरक्षा अधिकारीही सामील