मुंबई : आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा आदल्या दिवशी रात्री स्थगित करण्यात आली. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. आता ही आरोग्य विभागातील रद्द झालेली क आणि ड गटातील पदभरतीची परीक्षा 15-16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
ईडीची नोटीस येईल ही फॅशन झाली आहे; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर घणाघात
नुकतीच रद्द झालेली परीक्षा ऐन वेळेला पुढे ढकलण्यात आली. या मागे काही उमेदवाराचं हित हाच मुद्दा असल्याचं टोपे यांनी सांगितलं असलं तरी ऐन वेळेला परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्रावरती पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यावेळेला रद्द झालेली परीक्षा होणारं की नाही याबद्दलची साशंकता होती. राजेश टोपे यांनी आज मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत या तारखा निश्चित केल्या जातील. 15 व 16 ऑक्टोबरला रेल्वेची परीक्षा आहे ती पुढे ढकलता आली तर प्राधान्य म्हणून याच तारखेला परीक्षा घेतली जाईल. पुढे ढकलता नाही आली तर 22 किंवा 23 ऑक्टोबरला परीक्षा होईल असे राजेश टोपेंनी सांगितले आहे.
भाजपला पडली मोठी खिंडार: कर्डिले कट्टर समर्थकांचा मोठा फौजफाटा राष्ट्रवादीत दाखल
नोव्हेंबर 2016 मध्ये पंजाब सरकारने NYSA या कंपनीला तेथील गैरकारभार प्रकरणी तीन वर्षासाठी ब्लॅकलिस्ट केले. पुढे उच्च न्यायालयातून ही कंपनी ब्लॅकलिस्ट मधून बाहेर पडली. 2017 ला महाराष्ट्रातील FYJC म्हणजे अकरावी एडमिशन लिस्टचे काम NYSA Asia या कंपनीला दिले गेले, त्यातील पोर्टल मध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येऊन काही काळासाठी या कंपनीचे पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने या कंपनीवर काहीही कार्यवाही/दंड केला नाही.
Read Also :
- राजसाहेब, भाजपशी युती करा, निवडणुकीत फायदा होईल; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला
- काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजपाची माघार; राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार
- बहुसदस्यीय प्रभाग पद्घतीमुळे गुडघ्याचे बाशिंग सोडण्याची वेळ
- सत्ताधारी भाजप महानगरपालिका विकायला काढतील अशी शंका मला वाटते – राष्ट्रवादीचा घणाघात
- मोठी बातमी: शिवसेना नेते आनंदराव अडसुळ ईडीच्या ताब्यात; तब्येत बिघडल्याने रुग्णालयाकडे रवाना