मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती कळतीय. सकाळी त्यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली आहे. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी आज त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतीय. आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. सिटी बँकेत 900 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे.
ज्ञानाची दारं ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला उघडणार; थिएटरचे दर्शन मात्र २४ ऑक्टोंबरला मिळणार
आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार; वैतागलेल्या संभाजीराजेंचा निर्णय
आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे, असंही रवी राणा म्हणाले होते.
Read Also :
- शिवीगाळीची व्हायरल ऑडिओ क्लिप माझी नाही, हे विरोधकांचे कटकारस्थान; भाजप आमदाराचे स्पष्टीकरण
- आम्ही ठरवलंय, ठाकरे सरकारचा ऑटो पंक्चर करायंचा अन् बदलाय घ्यायचा – भाजप
- ईडीची नोटीस येईल ही फॅशन झाली आहे; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर घणाघात
- नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्या – उद्धव ठाकरे
- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचाच महापौर होणार; अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राऊतांची गर्जना