मुंबई : शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी ठाकरे सरकारनं दिली आहे.
लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका; अजित पवारांनी कंत्राटदारांना भरला दम
राज्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर धार्मिक स्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून, तर ज्ञानाची मंदिरं असणाऱ्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले. मंदिरांच्या कळस दर्शनावर गेली कित्येक महिने समाधान मानाव्या लागणाऱ्या भक्तांना, तसेच शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे.
मोठी बातमी: ४ ऑक्टोंबर पासून शाळा सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
पालक संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याची भूमिका मांडली होती. मुलांच्या भावनिक वाढीच्या दृष्टीनेही प्रत्यक्ष शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी राज्य शासनास दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. ऑगस्टमध्ये शाळा सुरू करण्याचा एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, राज्यात तिसरी लाट येण्याच्या भीतीने तो स्थगित झाला. तथापि, आता गणेशोत्सवानंतर रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात कुठेही वाढ झालेली दिसली नाही.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
– एखादा विद्यार्थी आजारी असेल, त्याला आजाराची लक्षणे दिसत असतील तर तातडीने उपाययोजना करण्यात येतील.
– मुलांना गणवेशाची सक्ती नसेल. घरच्या कपड्यांवरही शाळेत जाता येईल.
– प्रत्येक शाळेत शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक. विद्यार्थ्यांचे तापमान नियमितपणे तपासावे.
– इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घ्यावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. मुलांना शाळेत पायी येण्यासाठी प्रोत्साहित करावे.
– ज्या शाळांमध्ये स्कूलबस, खासगी वाहनांद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी प्रवास करेल याची दक्षता घ्यावी.
– सॅनिटायझरचा वापर करावा.
– विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाइन सादर करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.
– गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करून घ्यावा. मुलांना कमीतकमी पुस्तके/वह्या आणाव्या लागतील, अशी व्यवस्था असावी, असे सांगण्यात आले आहे.
– सीएसआर फंडांतून शाळांनी पंखे, सॅनिटायझर, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करावीत. अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
Read Also :
- परीक्षेतील गोंधळाला भ्रष्टाचारी सरकारच जबाबदार; काळ्या यादीतील कंपनीची सीआयडी मार्फत चौकशी करा – भाजप
- साहेब, ३००० रु खर्चकरून आलोयं, माय १५० रु रोजाने कामाला जाते; शेतकऱ्याच्या मुलांशी खेळू नका हो…
- दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- …तर ‘मातोश्री’ हे जेल म्हणून घोषित करायचं ठरलं होतं; छगन भुजबळांचा धक्कादायक खुलासा
- अनिल परब गोत्यात येणार? चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहा, ED ने बजावला पुन्हा समन्स