पुणे : भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील आमदार सुनील कांबळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होताना दिसत आहे. आमदार कांबळे यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये पुणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या एक वरिष्ठ महिला अधिकारी यांना शिवीगाळ केलं असल्याचं ऐकू येत आहे. मात्र, सुनील कांबळे यांनी खुलासा केला आहे ती ऑडिओ क्लिप माझी नाहीच, त्यात असणारा आवाज सुद्धा माझा नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असं भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यातील भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल
गेल्या २५ वर्षांमध्ये मी सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे विरोधकांना हे जड जात आहे. त्यामुळे हे माझ्याविरोधात कटकारस्थान आहे, असा दावाही कांबळे यांनी केला आहे. दरम्यान, सदर ऑडीओ क्लिपमध्ये असणारा माझा आवाज नाही. हे विरोधकांचं षडयंत्र आहे, असं सुनील कांबळे म्हणाले. तसंच, या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज मागे पुढे करण्यात आला आहे. ‘जी ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे ती माझी नाही.आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझी बदनामी करण्यासाठी ही क्लिप व्हायरल केली जात असल्याचं देखील कांबळे यांनी म्हटलं आहे.
शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरलं होताचं भाजप आमदाराचा फोन झाला ‘स्विच ऑफ’
गेल्या २५ वर्षांत ज्यांना काम जमले नाही ते काम आम्ही केलं आहे, त्यामुळे अशीही क्लिप व्हायरल केली आहे, असंही सुनील कांबळे यांनी म्हटलं. त्याचबरोबर ‘पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळे, महापौर आणि चित्रा वाघ यांच्याशी बोलणं झालं आहे. हा भाजपच्या विरोधात रचलेला कट आहे, अशी माहिती दिली आहे. दरम्यान, या क्लिप विरोधात मी पोलिसात तक्रार करणार आहे. पोलिसांनी माझी बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही कांबळे यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.
राष्ट्रवादीकडून जोरदार घोषणाबाजी
सदर प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्तांकडे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून सुनील कांबळे यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आज भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील कांबळे यांचं तातडीनं निलंबन करावं आणि सुष्मिता शिर्के यांना महापालिकेमध्ये पुन्हा एकदा त्याच पदावर रुजू करावं अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
Read Also :
- आम्ही ठरवलंय, ठाकरे सरकारचा ऑटो पंक्चर करायंचा अन् बदलाय घ्यायचा – भाजप
- ईडीची नोटीस येईल ही फॅशन झाली आहे; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर घणाघात
- नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्या – उद्धव ठाकरे
- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचाच महापौर होणार; अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राऊतांची गर्जना
- शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरलं होताचं भाजप आमदाराचा फोन झाला ‘स्विच ऑफ’