पुणे : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला मोठा इशारा दिला आहे. आमची क्लिअर भूमिका आहे. आम्ही ठरवलंय, 51 टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचाय, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे.
बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता – गोपीचंद पडळकर
चांदा ते बांदा दरम्यानच्या मतदान केंद्रावर 25 लाख युवांना संकल्प यात्रा काढून जोडण्याचं अभियान सुरू करण्यात आलं आहे. 25 डिसेंबर हा अटलजींचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आम्ही हा संकल्प पूर्ण करू, असं बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकारवर टीका केली. महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामूळे ओबीसी, मराठा आरक्षण गेलं. आम्हाला या सरकारचा बदला घ्यायचा आहे. कोर्टाने 4 मार्चला सांगितलं होतं की राज्य सरकारने डेटा तयार करावा. मात्र सरकारने डेटा तयार केला नाही. हा डेटा सेन्सस डेटा आहे. त्यावेळी मनमोहन सिंगांनी सांगितलं होतं यात चुका आहेत. अजित पवारांनी खोटी माहिती दिली. या सरकारला आरक्षण द्यायचं नाही. त्यांना अन्यायच करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजपला पडली मोठी खिंडार: कर्डिले कट्टर समर्थकांचा मोठा फौजफाटा राष्ट्रवादीत दाखल
शेतकऱ्यांच वीज कनेक्शन कापणं सुरू झालंय. हे सरकार मुघलांसारखे वागत आहे. युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य विभागाची परीक्षा जाहीर केली आणि 12 तास आधी रद्द केली, हा सर्वच सावळागोंधळ सुरू आहे, असं ही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री वांद्र्यापूरते आणि मंत्री गावापूरते राहिले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
Read Also :
- ईडीची नोटीस येईल ही फॅशन झाली आहे; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर घणाघात
- नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्या – उद्धव ठाकरे
- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचाच महापौर होणार; अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राऊतांची गर्जना
- शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरलं होताचं भाजप आमदाराचा फोन झाला ‘स्विच ऑफ’
- दिल्लीत अमित शहांसोबत उद्धव ठाकरेंची महत्त्वाची बैठक सुरू; पोलीस महासंचालकही हजर