मुंबई : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने ठाकरे सरकावर विविध मुद्यांवरून टीका करत असतात. त्यांच्या टीकेवरून राजकीय वादंग देखील निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. आता देखील गोपीचंद पडळकर यांनी पदभरतीच्या मुद्य्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
५ वर्ष नाही, हजार वर्षे तुम्ही सत्ता राखा, पण राज्यातील महिला…- सुधीर मुनगंटीवार आक्रमक
“आघाडी सरकारमध्ये अनेक विभागात ११ हजार ३५१ पद रिक्त असताना, मात्र यांनी MPSC कडे फक्त ४ हजार २६४ पदांची मागणी केली. स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार करण्यापुरते प्रस्थापितांकडे रिक्त पदं आहेत. बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता.” अशी जोरदार टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळक यांनी केली आहे.
#आघाडी_सरकारमध्ये अनेक विभागात ११,३५१ पद रिक्त असताना मात्र यांनी #MPSC कडे फक्त ४,२६४ पदांची मागणी केली. स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार करण्यापुरते प्रस्थापितांकडे रिक्त पदं आहेत. बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता @CMOMaharashtra @BJP4Maharashtra pic.twitter.com/bIK7ETXt6Z
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 25, 2021
आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओत ते म्हणतात, “ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरचा जीव गमवावा लागला होता. तरी देखील या सरकारनं ना नियुक्त्या दिल्या ना पदभरती केली. आतातर वेगवेगळ्या २० विभागात जवळपास ११ हजार ३५१ पद रिक्त असताना, लोकसेवा आयोगाकडं केवळ ४ हजार २६४ रिक्त पदांच्या पदभरती करावी अशी मागणी सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. यापेक्षा कहर म्हणजे कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात जवळपास विविध श्रेणीतील २५०० च्या आसपास पदं रिक्त होती. तरी देखील अमित देशमुख यांनी कोणतीही पद भरतीची मागणी, सरकारकडे केली नाही. हीच परिस्थिती अनेक खात्यांची आहे. प्रशासन आणि सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. मग हे काय फक्त टक्केवारीच्या फुगड्या खेळतायेत का?”
Read Also :
- ज्यांना-ज्यांना भिती वाटते, त्यांनी सरळ भाजपात जावे; छगन भुजबळांचा रोख कुणाकडे?
- कारखानदारांनो, साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल – नितीन गडकरी
- मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार; वैतागलेल्या संभाजीराजेंचा निर्णय
- ज्ञानाची दारं ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला उघडणार; थिएटरचे दर्शन मात्र २४ ऑक्टोंबरला मिळणार
- परीक्षेतील गोंधळाला भ्रष्टाचारी सरकारच जबाबदार; काळ्या यादीतील कंपनीची सीआयडी मार्फत चौकशी करा – भाजप