पुणे : पुणे महापालिकेतील महिला अभियंत्याला शिवीगाळ केल्यानंतर ऑडिओ क्लिप सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे, नेटकऱ्यांकडून होवू लागलेल्या टिकेमुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांनी आपला मोबाईल फोन बंद ठेवला आहे.
नेमका प्रकार काय झाला हे समजून घेण्यासाठी आमदार कांबळे यांना अनेकवेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद लागला. दरम्यान, महिला आधिकाऱ्याला शिवीगाळ करणारी ध्ननिफित सोशल मिडीयावर व्हायरला झाल्यानंतर आमदार कांबळे यांच्यावर टिकेचा भडिमार सुरू झाला आहे. त्यामुळे कांबळे यांनी फोन बंद ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आमदार कांबळे यांच्या वर्तनाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला असून दुपारी आमदार कांबळे यांच्या निवासस्थानाबाहेर शहर राष्ट्रवादी काँग्रसेच्यावतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.
५ वर्ष नाही, हजार वर्षे तुम्ही सत्ता राखा, पण राज्यातील महिला…- सुधीर मुनगंटीवार आक्रमक
महिला अभियंत्याला शिवीगाळ करून आमदार कांबळे यांनी नालायकणाच्या आणि बेशरमेच्या साऱ्या खुना ओलांडल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली आहे. त्यांनी आमदार कांबळे यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या प्रकरणात आमदार कांबळे यांनी संबंधित महिला अभियंत्यांची तसेच समस्त महिलांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.
आमदार सुनील कांबळे ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे.
महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केवळ त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे.1/2@maharashtra_hmo @PuneCityPolice pic.twitter.com/OqObgC00LX— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 26, 2021
चाकरणकर म्हणाल्या, ‘‘ आमदार कांबळे हे भाजपा व संघाच्या संस्कारातून आले आहेत. संघ-भाजपाच्या चिखलात आमदार कांबळे यांच्यासारखी भाषा वापरणारी कमळेच उगवणार कारण त्यांची संस्कृतीच तशी आहे.ज्यांना शिवीगाळ करण्यात आली त्या महिला आधिकाऱ्यांनी आमदार कांबळे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. या प्रकरणात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस त्या महिला अभियंत्यांसोबत आहे.’’
Read Also :
- दिल्लीत अमित शहांसोबत उद्धव ठाकरेंची महत्त्वाची बैठक सुरू; पोलीस महासंचालकही हजर
- हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा; किरीट सोमय्या खवळले
- पुण्यातील भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल
- भाजपला पडली मोठी खिंडार: कर्डिले कट्टर समर्थकांचा मोठा फौजफाटा राष्ट्रवादीत दाखल
- बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता – गोपीचंद पडळकर