मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून विरोधकांची हास्यजत्रा या मथळ्यातून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला. यावर ‘हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. जर किरीट सोमय्याची हास्य जत्रा आहे किंवा विरोधी पक्षातच जोर नाही, मग सामनामधून किरीट सोमय्याची दखल का घेता? असा सवालही त्यांनी केला आहे.
दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेले घोटाळे कोल्हापूरमध्ये जाऊन उघडकीस आणणार असल्याची घोषणा करत किरीट सोमय्यांनी कोल्हापूर दौऱ्याचा निर्धार केला आहे. किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. कोल्हापुरात जाऊन पाहणी करण्याचा सोमय्यांनी चंगच बांधलाय. पण पुढे महाविकास आघाडीने देखील आक्रमक पवित्रा घेतला आणि सोमय्यांना कोल्हापुरात न जाता कराडमध्येच थांबावं लागलं. पण यादरम्यान कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे समर्थक आणि मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता मंगळवार आणि बुधवारी पुन्हा एकदा सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर असतील.
खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात, रस्त्याची कामे नीट करा – एकनाथ शिंदे
किरीट सोमय्यांची कोल्हापूर दौऱ्यात अडवणूक करणं गैर आहे, असं शरद पवार स्वत: बोलतात. सरकारला सांगावे लागते की दौरा अडवला याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला नव्हती. हे अत्यंत चुकीचं असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला. किरीट सोमय्यांचा दौरा सरकारला का अडवावा लागतो. हे सगळं सरकार का करतंय? असे एक ना अनेक सवाल किरीट सोमय्यांनी यावेळी उपस्थित केले.
५ वर्ष नाही, हजार वर्षे तुम्ही सत्ता राखा, पण राज्यातील महिला…- सुधीर मुनगंटीवार आक्रमक
उद्यापासून मुंबई प्रभादेवी येथून सोमय्या आपल्या कोल्हापूर दौऱ्याला प्रारंभ करतील. या दौऱ्यात कोल्हापूरमधील मुरगुड, कागल, इथे भेट देण्याचा सोमय्यांचा मानस आहे. कोल्हापूर पोलीस स्टेशनला हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तिसऱ्या घोटाळ्याविरोधात सोमय्या तक्रार दाखल करणार आहे. यावेळी सोमय्यांबरोबर भाजप नेत्यांची फौज असणार आहे. कोल्हापूर दौऱ्यामध्ये विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, अशिष शेलार आणि गोपाळ शेट्टी सोमय्यांबरोबर असतील.
Read Also :
- पुण्यातील भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल
- भाजपला पडली मोठी खिंडार: कर्डिले कट्टर समर्थकांचा मोठा फौजफाटा राष्ट्रवादीत दाखल
- बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता – गोपीचंद पडळकर
- ज्यांना-ज्यांना भिती वाटते, त्यांनी सरळ भाजपात जावे; छगन भुजबळांचा रोख कुणाकडे?
- कारखानदारांनो, साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल – नितीन गडकरी