अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्या, सहकारी संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपचे कट्टर समर्थक फोडण्यास सुरवात केली आहे. कर्जत-जामखेडमध्ये सुरू असलेल्या या प्रयोगाचे लोण आज राहुरीतही पोचले.
खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात, रस्त्याची कामे नीट करा – एकनाथ शिंदे
राहुरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक नगरसेवक शहाजी जाधव (ठाकूर) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ राहुरी मतदारसंघातील धनगरवाडीचे (ता. नगर) सरपंच किशोर शिकारे यांनी चार ग्रामपंचायत सदस्यांसह भाजपला सोडचिठ्ठी देऊन, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंना दिलेला धक्का मानला जात आहे.
आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलली! मनस्तापाबद्दल माफी मागतो – राजेश टोपे
आज (शनिवारी) अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा झाला. जिल्हा सरचिटणीस सुनील आडसुरे, राहुरीचे नगराध्यक्ष अनिल कासार, रोहिदास कर्डिले, प्रकाश भुजाडी, बाळासाहेब उंडे, दशरथ पोपळघट, संजय साळवे, राष्ट्रवादी कला, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. श्याम शिंदे उपस्थित होते. नगरसेवक जाधव (ठाकूर) म्हणाले, मंत्री तनपुरे नगराध्यक्ष असताना विरोधी नगरसेवक म्हणून प्रभागात विकास कामांमध्ये कधीही दुजाभाव केला नाही. यापुढेही राष्ट्रवादीचे एकनिष्ठ काम करून, पक्षाची व मंत्री तनपुरे यांची ताकद वाढविण्यास मदत करू, असे सांगितले.
५ वर्ष नाही, हजार वर्षे तुम्ही सत्ता राखा, पण राज्यातील महिला…- सुधीर मुनगंटीवार आक्रमक
जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले, “राहुरी पालिकेच्या आगामी निवडणुकीत विरोधकांना शून्यावर बाद करण्याचा मंत्री तनपुरे यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीकडे तरुण आकर्षित होत आहेत. कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीत प्रवेशाचा ट्रेंड सुरू झाला आहे. मंत्री तनपुरे यांनी सांगितले की, नगरसेवक जाधव (ठाकूर) तळागाळातील जनतेच्या समस्या समजून घेऊन काम करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या प्रभागात जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून, त्यांना राष्ट्रवादीत योग्य सन्मान मिळेल. नगर तालुक्यात वीज विषयक समस्या दूर करण्यासाठी नियोजनबद्ध काम चालविले आहे. नगर तालुक्यात विकासाचे राजकारण करुन, आघाडीवर राहू, असा विश्वास मंत्री तनपुरे यांनी व्यक्त केला.
Read Also :
- बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता – गोपीचंद पडळकर
- ज्यांना-ज्यांना भिती वाटते, त्यांनी सरळ भाजपात जावे; छगन भुजबळांचा रोख कुणाकडे?
- कारखानदारांनो, साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल – नितीन गडकरी
- मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार; वैतागलेल्या संभाजीराजेंचा निर्णय
- ज्ञानाची दारं ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला उघडणार; थिएटरचे दर्शन मात्र २४ ऑक्टोंबरला मिळणार