मावळ : लोणावळा नगरपरिषदेची निवडणुक जसजशी जवळ येऊ लागली तसतशी येथील राजकीय स्थिती तापू लागले आहेत. सुरुवातीला नगरपरिषद निवडणुका एक वॉर्ड पद्घतीने होणार होत्या, त्यामुळे अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत नगरपरिषद लढण्याची तयारी सुरु केली होती. मात्र दोन दिवसापुर्वी नगरपरिषद निवडणुका वॉर्डनिहाय न होता बहुसदस्यीय प्रभाग पद्घतीने घेण्याचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढल्याने अनेक इच्छुकांचे धाबे दणाणले असून काही जणांनी आपल्या तलवारी म्यान केल्याचे बोलून दाखवले आहे. एक वॉर्ड पद्घतीने होणार्या निवडणुकांसाठी मतदार संख्या मर्यादित असते, तसेच हक्काची मते, मनी व मसल पॉवरच्या जीवावर त्या सहज जिंकता येतात, याकरिता काही मंडळींनी तयारी करत फ्लेक्सबाजी, सकाळचे गुड मॉर्निंगचे मेसेज, सुविचार मेसेज पाठवत आपण कसे योग्य उमेदवार आहोत, आपले विचार किती चांगले आहेत याची भुरळ मतदारांवर पाडण्यास सुरुवात केली होती. नागरी समस्यांवर पाच वर्ष मनातल्या मनात देखील ज्यांनी ब्र काढला नाही ते आता शहराच्या विकासासाठी मी कसा योग्य आहे, मला कोणा कोणाचा पाठिंबा आहे हे पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्घतीमुळे चांगले उमेदवार व पक्षीय उमेदवार निवडून येण्यास मदत होणार आहे.
पुण्यातील भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल
लोणावळा नगरपरिषदेची मागील पंचवार्षिक निवडणूक ही देखील बहुसदस्यीय पद्घतीने झाली होती. त्यावेळी 2011 ची लोकसंख्या विचारात घेत शहराचे 25 वॉर्ड (12 प्रभाग) तयार करण्यात आले होते. यावर्षी देखील तोच फाॅर्म्युला असणार आहे. 2021 ची जनगणना कोरोनामुळे न झाल्याने 2011 च्या लोकसंख्येनुसारच वाॅर्ड (प्रभाग) असतील. यामध्ये केवळ नविन मतदार जोडले जाणार आहेत. प्रभागरचनेत काहीसा बदल करून कायम करण्यात येतील.
बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता – गोपीचंद पडळकर
बहुसदस्यीय प्रभाग पद्घतीमध्ये विकास कामांना महत्व देणार्या उमेदवाराला नागरिकांचा पाठिंबा राहतो हा इतिहास आहे. येथे मनी व मसल पाॅवर पेक्षा तुमचे काम फार महत्वाचे असते. सत्ताधारी गटाचा जो लोकप्रतिनिधी प्रभागाच्या व शहराच्या विकासाला पाठिंबा देत नागरिकांचे प्रश्न सोडवितो त्याला तसेच ज्या विरोधकांनी (लोकप्रतिनिधी/पक्ष नेते) नागरी समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करून नागरिकांना न्याय मिळवून दिला अशाच उमेदवारांना मतदार पुन्हा पसंती देतात. दोन सदस्यीय प्रभाग रचनेत साधारणतः साडेतीन ते चार हजार मतदार असतात. ऐवढ्या मोठ्या प्रभागात ज्यांचे काम आहे व ज्यांनी नागरी समस्यांवर काम केले आहे, अशाच चांगल्या उमेदवारांना चांगले दिवस असणार आहेत. यामुळे बहुसदस्यीय प्रभागाची घोषणा होताच अनेक स्वंयघोषीत इच्छुकांनी एक पाऊल मागे घेतले आहे. तर काहीनी वेट अँन्ड वाॅचची भुमिका घेतली आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार; वैतागलेल्या संभाजीराजेंचा निर्णय
लोणावळा शहरात सध्या भाजप, काँग्रेस व आरपीआय अशी सत्ता असून शिवसेना विरोधात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा लोणावळा नगरपरिषदेत एकही सदस्य नाही. पक्ष पातळीवर लोणावळा शहर भाजपामध्ये दोन गट आहेत. तर महाविकास आघाडीत तिघाडी असल्याने राजकीय समीकरणं कशी ठरतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Read Also :
- सत्ताधारी भाजप महानगरपालिका विकायला काढतील अशी शंका मला वाटते – राष्ट्रवादीचा घणाघात
- मोठी बातमी: शिवसेना नेते आनंदराव अडसुळ ईडीच्या ताब्यात; तब्येत बिघडल्याने रुग्णालयाकडे रवाना
- शिवीगाळीची व्हायरल ऑडिओ क्लिप माझी नाही, हे विरोधकांचे कटकारस्थान; भाजप आमदाराचे स्पष्टीकरण
- आम्ही ठरवलंय, ठाकरे सरकारचा ऑटो पंक्चर करायंचा अन् बदलाय घ्यायचा – भाजप
- ईडीची नोटीस येईल ही फॅशन झाली आहे; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर घणाघात