मुंबई : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने आज मंगळवारी मोठी कारवाई करत शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी यांचे निकटवर्ती सईद खान यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केली आहे. सुमारे महिनाभरापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने भावना गवळी 5 ठिकाणी छापे टाकले.
दिल्लीत जेवणाच्या टेबलवर उद्धव ठाकरे शहांच्या बगलमध्ये; एकमेकांच्या बाजूला बसून नेमकं काय शिजलं?
ईडीचा हा छापा 100 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावरून करण्यात आला. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने येथून अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
Saeed Khan, a close aide of Shiv Sena leader Bhavana Gawali, was arrested by the Enforcement Directorate, in connection with an alleged money laundering case. He will be presented before the court today. pic.twitter.com/wcvQtPcJS9
— ANI (@ANI) September 28, 2021
खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर 30 ऑगस्टला ईडीने ED छापेमारी केली होती. जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. तसेच बालाजी पार्टीकल बोर्ड या कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप खासदार गवळींवर आहेत.
Mumbai | Saeed Khan, a close aide of Shiv Sena leader Bhavana Gawali, has been arrested by the Enforcement Directorate, in connection with an alleged money laundering case.
He will be presented before the Special PMLA court today. pic.twitter.com/fx5HiZnoZU
— ANI (@ANI) September 28, 2021
सूचना न देता केलेली कारवाई
पण भावना गवळीने ईडीच्या छाप्यांवर आपली प्रतिक्रिया देताना, नोटीस न देता त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे म्हटले आहे. भावना गवळी यांनी आरोप केला की, ईडीची ही कारवाई भाजपच्या सांगण्यावरून केली जात आहे. असे त्यांनी सांगितले.
Read Also :
- धनंजय मुंडेंना पुढील 10 निवडणुकांमध्ये परळीत कोणीही रोखू शकणार नाही – जयंत पाटील
- मोठी बातमी! प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पुराच्या पाण्यात गेली वाहून
- मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचे काहीच चालत नाही; अजित पवारांची मिश्किलपणे नाराजी व्यक्त
- पुणे महापालिकेच्या मामाराव दाते मुद्रणालयात दारुच्या पार्ट्या; सुरक्षा अधिकारीही सामील
- मित्राने मित्राचा शब्द पाळला, भाजपनं मनाचा मोठेपणा दाखवला; रजनी पाटील यांच्या भावना