यवतमाळ : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यामध्ये पावसाची तीव्रता वाढली आहे. मराठवाडा, बीड, नागपूरमध्ये सोमवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असताना एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस नेण्याचा प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे.
आम्ही ठरवलंय, ठाकरे सरकारचा ऑटो पंक्चर करायंचा अन् बदलाय घ्यायचा – भाजप
उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरुन पाणी असताना नागपूर डेपोची एसटी बस चालकाने नाल्यावरुन टाकल्याने गाडी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. बसमधे चार ते सहा प्रवासी होते असे समजते.
शिवीगाळीची व्हायरल ऑडिओ क्लिप माझी नाही, हे विरोधकांचे कटकारस्थान; भाजप आमदाराचे स्पष्टीकरण
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून एसटी दहागांव नाला पार करत असताना हा प्रकार घडला आहे. उमरखेड तहसीलदार ठाणेदार सध्या घटनास्थळी आहेत व स्थानिक नागरिक व तालुका टीमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एसटी बस नाल्यात वाहून गेल्यानंतर एसटीतील दोन प्रवासी झाडावर चढलेले आहेत व दोन लोक एसटी बसच्या टपावर आहेत. कंडक्टरनं झाडावर असून त्याने सोबत ५ते ६ प्रवासी असल्याचे ओरडुन सांगितले. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बस नागपूर डेपोची होती नांदेड वरून नागपूरला निघाली होती.
Read Also :
- मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचे काहीच चालत नाही; अजित पवारांची मिश्किलपणे नाराजी व्यक्त
- पुणे महापालिकेच्या मामाराव दाते मुद्रणालयात दारुच्या पार्ट्या; सुरक्षा अधिकारीही सामील
- मित्राने मित्राचा शब्द पाळला, भाजपनं मनाचा मोठेपणा दाखवला; रजनी पाटील यांच्या भावना
- मोठी बातमी: अखेर भाजप- मनसे एकत्र आले; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात फुटला युतीचा नारळ
- अडसुळ अडकले, आता हसन मुश्रीफांना कुणीच वाचवू शकणार नाही; किरीट सोमय्याचा दावा