नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना सगळ्या जागा स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे, अशी माहिती शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. शिवसेना नेते संजय राऊत पाच दिवसांच्या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याची माहिती शिवसेनेने दिली. पुढील वर्षी नाशिक महापालिका निवडणूक होत आहे, त्यासाठी आता सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत, असे त्यांनी सांगितले.
नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु केले. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र ती पोकळी भरुन काढण्यासाठी शिवसेनेने सुधाकर बडगुजर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे शिवसेनेनं चौकाचौकात शाखा उद्घाटनाचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे भाजपनं आता ‘मौका देख के चौका’ मारण्याचं ठरवलं आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करत कामाला लागावे. तसेच वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न बघता प्रसंगी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचीदेखील तयारी ठेवा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
Read Also :
- दुसऱ्या पक्षातील दिग्गज नेते शरद पवारांच्या प्रेमात पडलेतं – जयंत पाटील
- मुंबई कधीच तुंबणार नाही, असा दावा केलाचं नव्हता; महापौर पेडणेकरांनी हात झटकले
- मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य करणं योग्य नाही – जयंत पाटील
- “उद्धवजी, गणेशोत्सवाबद्दलची ठोस भूमिका जाहीर करून मार्ग मोकळा करा”
- मुंबई तुंबली नागरिकांचे हाल; महापालिकेत पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा – शेलारांचा आरोप