शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. श्वास घेण्यास पुन्हा त्रास जाणवल्याने सुर्वे यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुनील सुर्वे यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुनील सुर्वे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपदही भूषवले आहे. सुर्वे यांनी 2017 मध्ये उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत पाणी प्रश्नावर आक्रमक झालेल्या सुर्वेंनी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर पाण्याची बाटली फेकून मारल्याने ते चर्चेत आले होते.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाह यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.