बुलढाणा : वादग्रस्त वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत राहणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोरील इनोव्हा गाडी पेट्रोल टाकून ती जाळण्याचा, तसेच त्याचा स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न आज पहाटे तीन वाजता अज्ञातांकडून झाला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटना घडली तेव्हा नुकतेच रात्री दीड वाजण्याच्या सुमारास संजय गायकवाड हे मुंबईहुन परत त्यांच्या घरी आले होते. यानंतर ही चार चाकी गाडी त्यांनी त्यांच्या घरासमोर लावली. पहाटे तीनच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवर त्यांच्या घरासमोर आले आणि त्यांनी गाडीच्या पेट्रोल टॅंकवर पेट्रोल टाकून इनोव्हाचा स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला.
या गाडीच्या मागे-पुढे आणखीन काही गाड्या उभा होत्या त्यामुळे गाडी पेटली असती आणि त्या आगीच्या कचाट्यात इतर काही गाड्या आल्या असत्या तर मात्र फार मोठा अनर्थ होऊन गायकवाड परिवाराला देखील इजा पोहोचली असती. तसेच, दरम्याज्यावेळी हा हल्ला झाला त्याचवेळी परिसरातील विद्युत पुरवठा देखील हल्लेखोरांनी तोडला होता, त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा दावा आमदार गायकवाड यांनी केला आहे.
तसेच, आता या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून, श्वान पथकाद्वारेही हल्लेखोरांचा शोध घेणे सुरु आहे. याप्रकरणी संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असून, त्यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
Read Also :
- “उद्धव, मी तुझी शिक्षिका, आमच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालंय, बाळा भेट मला”
- ‘मराठा क्रांती मोर्चाचा आणि विनायक मेटेंच्या मोर्चाचा काहीही संबंध नाही’
- ‘आरक्षणासाठी संभाजीराजे खासदारकीचा राजीनामा देणार?’
- उजनीचा पाणीप्रश्न पेटला, शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन
- ‘वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका’, भातखळकरांचे रोहित पवारांवर टीकास्त्र