मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर, मराठा समाजात सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे मराठा समाज परत एकदा आंदोलने आणि मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, महामारीचा संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे, ही लाट ओसरल्यानंतर याबाबत काही ठोस निर्णय घेतला जाईल, असा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या मराठा समाजाच्या विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, हे आंदोलन छेडण्याआधीच या मराठा संघटनांमध्ये मतभेद असल्याचे समोर येत असून, ‘मेटे यांच्या नेतृत्वा खाली निघणारा हा मोर्चा किंवा आंदोलन हे त्यांचे वैयक्तिक असल्याची स्पष्टोक्ती, मराठा क्रांती मोर्चाकडून दिली गेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली असून, येत्या १ ते ५ जून दरम्यान बीडमधून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
मात्र, येत्या ५ तारखेला निघणारा हा मोर्चा त्यांचा वैयक्तिक असल्याचे मराठा क्रांती मोर्चा कडून सांगण्यात आले आहे. तसेच, मेटे काढत असलेला पक्ष संघटनेच्या नावाखाली काढत असून, त्यांचा मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नसल्याचे देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चकडून स्पष्ट करण्यात आले आहे,’ असं मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र मस्के यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- ‘आरक्षणासाठी संभाजीराजे खासदारकीचा राजीनामा देणार?’
- उजनीचा पाणीप्रश्न पेटला, शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन
- हिंदूस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला कोरोना प्रतिबंध लसनिर्मितीसाठी केंद्र सरकार सकारात्मक!
- नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात तातडीने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणावा – अशोक चव्हाण
- ‘गृह विलगिकरण बंद करण्याचा निर्णय व्यवहार्य नसून त्याचा पुनर्विचार करावा’